loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तह‌सिलमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ई- शिधापत्रिकांच्या वाटपासह सुशासन सप्ताह शिबीर

खेड :- येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ई-शिधापत्रिकांच्या वाटपासह सुशासन सप्ताह शिबिर सुध्दा मोठ्या उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम तहसील कार्यालय खेड, अखिल भारतीय ग्राहक मंच शाखा खेड आणि पुरवठा शाखा खेड यांच्यावतीने करण्यात आला. उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुधीर सोनावणे यांच्या सूचनेनुसार पुरवठा निरीक्षक श्रीमती रसिका ढवळ, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल देशमुख, महसूल सहाय्यक नामदेव काळबोंडे, पुरवठा लिपिक दीपक चव्हाण व श्रीकृष्ण यादव, संगणक परिचालक सुप्रिया साळवी तसेच अखिल भारतीय ग्राहक मंच शाखा खेडचे तालु‌काध्यक्ष विजय येरूणकर व त्यांचे सर्व सह‌कारी तसेच ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, उपाध्यक्ष अजित तटकरी आदीनी संयुक्तरीत्या व संघटीतरित्या हा कार्यक्रम दिमाखदारपणे पार पाडला. पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांसाठी रेशनकार्ड संबंधित विविध कामांचे व प्रलंबित विषयांचे सुशासन सप्ताह निमित्त शिबीर पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तालुकाध्यक्ष विजय येरूणकर , जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, उपाध्यक्ष अजित तटकरी, रामचंद्र गणपत येसरे बुवा आदीसह अधिकारी वर्गाने आपापली मनोगत व्यक्त करून ग्राहकामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिबिरात ऑनलाईन ई-केवायसी करणे, रेशनकार्डवर नावे चढवणे न कमी करणे, रास्त धान्य मिळणाऱ्या कुटुंबातील नव्याने वाढवलेल्या लोकांचे ऑनलाईन करणे हि कामे प्रत्यक्ष अधिकारी यांच्या समवेत मोफत पार पडली. या शिबिरात शिधापत्रिकाधारकांना ई - शिधापत्रिकांचे वाटप हा महत्वाचा टप्पा ठरला असून शिधापत्रिकाधारकांमध्ये उत्साह दिसून येत होता. या शिबिरात तालुक्यातील बहुतांश ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. रेशनकार्डवरील नावे कमी करणे, नावे चढवणे, ऑनलाईन करणे या कामांसह उपस्थित सर्वजणांची ई-केवायसी मोफत करण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक मंचाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चाळके, सचिव जयेश कदम, सदस्य दिवाकर प्रभु, प्रसाद मोडसिंग, अक्षय मोरे, राजेंद्र पाटील, रोहन तांबे हे सदस्य उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg