loader
Breaking News
Breaking News
Foto

फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल, दोडामार्ग यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग येथील फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास राहुल गुरव (तहसीलदार, कसई–दोडामार्ग) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच तेजस देसाई, राजाराम सावंत (JVM Promoter) व संध्या प्रसादी (शिक्षण सभापती, कसई–दोडामार्ग) यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, अभिनय व नाट्यछटा यांचे मनमोहक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक व मान्यवर भारावून गेले. लहान वयातच संस्कार, आत्मविश्वास व सर्जनशीलता विकसित व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाईक शिक्षिका यांनी केले. प्रास्ताविक संचालिका खोंबरेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पटकारे शिक्षिका यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षकवृंद, पालक व सहकार्यांचे फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल, दोडामार्ग यांच्याकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg