loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई महानगरपालिका निवडणुक प्रचारासाठी १० दिवस , दोन्ही शिवसेना पक्ष साठी अस्तिवाची लढाई

मुंबई: महानगरपालिका क्षेत्रात १५ जानेवारी रोजी २२७ जागांसाठी निवडणूक होत आहे. आजपासून प्रचारासाठी मोजकेच दिवस उरले आहेत. काल रात्रीच्या पार्ट्या मधून फ्रेश होऊन कार्यकर्ते आता प्रचाराचा धुमधडाका उडवतील. मतदार राजा आता बेजार होईल, स्थानिक कार्यकर्त्यांच्या समूहावर दारोमदार असल्याने तेच खिसे भरून घेतील , असे बोलले जाते.निवडणुकीत लाखों, करोडोंच्या नोटांची बंडले उधळली जातील. आजच्या निवडणुकांचे स्वरूप पालटून गेले आहे. सभेत किव्वा बैठकांत लोक सहभागी होतात मात्र मत दुसरीकडे देतात , त्यामुळे जनसेवक हेच या निवडणुकीचे समीकरण ठरवतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन्ही शिवसेना पक्ष साठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. शिवसेना व भाजपा युती , शिवसेना ठाकरे व मनसे युती, काँग्रेस व वंचित आघाडी एकत्र तर रिपब्लिकन आठवले यांची शिवसेना भाजपा सोबत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतील , तसेच बंडखोर, अपक्ष आहेत. शिवाय समाजवादी, AIM, जनता दल, बसपा आहेतच. त्यामुळे दोन्ही शिवसेना यांचा संघर्ष टोकाचा राहील.फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे, या निवडणुकीनंतर स्पष्ट झालेल्या राजकीय गणिताचा प्रभाव महत्वपूर्ण ठरेल.मुंबई महानगरपालिकेत 227 प्रभागातून निवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपा पक्ष प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेने अस्तित्वाच्या लढाईचा प्रणसंग्राम सुरू केला आहे, हा रणसंग्राम मुंबईतील 60% मराठी जनता ठरवू शकते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg