loader
Breaking News
Breaking News
Foto

​बोलीभाषांचे जतन मराठी भाषेत होणे काळाची गरज; माजी मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - "मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील बोलीभाषेचे जतन होणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनांसाठी कोणाकडेही हात पसरावे लागू नयेत, याच भूमिकेतून मी मराठी भाषा मंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात साहित्य संमेलन घेण्याचा आणि त्यासाठी हक्काचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला," असे प्रतिपादन माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले. ​महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या नवरंग मंचावर पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते. ​केसरकर पुढे म्हणाले की, "मराठी साहित्याने मानवी जीवन समृद्ध होते. परदेशातील मराठी शाळा आणि जागतिक मराठी संमेलनांच्या माध्यमातून मराठी भाषा जगभर पोहोचवण्याचे काम आम्ही केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वि. स. खांडेकर आणि विंदा करंदीकर यांसारख्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचा वारसा लाभला आहे, हे आपले भाग्य आहे. कोकणातील साहित्य जपण्यासाठी आणि साहित्यिकांना मान देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, अभिनेत्री डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, पत्रकार शेखर सामंत, सहाय्यक शिक्षण उपसंचालक गणपती कमळकर, रमेश बोंद्रे, विठ्ठल कदम, रमेश बोंद्रे, महादेव देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ​नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "माझी मातृभाषा मराठी नसली तरी मी महाराष्ट्राची मुलगी आणि सावंतवाडीची सून म्हणून मराठी भाषा व साहित्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन." तसेच श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचा आदर्शाची शिदोरी घेऊन काम करणार आहे.

टाईम्स स्पेशल

​या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला: ​जीवन गौरव पुरस्कार: विठ्ठल गावकर (दशावतार), ना. जी. परब, सुरेश रणशिंग, विजयालक्ष्मी भोसले, डॉ. अशोक सुर्वे, संजीवनी देसाई आदी तर ​युवा प्रेरणा पुरस्कार: रवी जाधव (सामाजिक), प्रमोद दळवी (कृषी), अक्षय सावंत (चित्रकला), पूजा गवस (वेब सिरीज) यांचा सत्कार करण्यात आला. ​आर.पी.डी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत व स्वागत गीत सादर केले. ​दादा मडकईकर यांनी 'अशा लाल मातीत जन्माला यावे' ही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. उषा परब यांच्या 'नाटक आणि वैनतेय' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ​प्रास्ताविक ॲड. संदीप निंबाळकर यांनी केले, तर स्वागत मनोगत प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले.आभार रमेश बोंद्रे यांनी मानले. या सोहळ्याला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, डॉ जी ए बुवा, बाळ बोर्डेकर, सीमा मठकर यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक, रसिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg