loader
Breaking News
Breaking News
Foto

​सकस अन्नासाठी सतर्कता आणि कृषी पर्यटनाची जोड गरजेची - डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - "प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलागुण ओळखून नवनवीन उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मी कला आणि दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत असतानाही, सकस अन्न सर्वांना मिळावे या ध्येयाने कोकणात कृषी पर्यटन सुरू केले. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र ध्येय विचलित होऊ दिले नाही. आज समाजात अन्नाविषयी जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर यांनी केले. ​सावंतवाडी येथे आयोजित पहिल्या साहित्य संमेलनामध्ये डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी डॉ. सुमेधा नाईक धुरी व प्रा. अमर प्रभू यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ​आपल्या प्रवासाविषयी सांगताना डॉ. संपदा म्हणाल्या की, "माझे पती जाहिरात विभागात कार्यरत होते. एकदा 'चिंगम'ची जाहिरात करण्याची वेळ त्यांच्यावर आली, तेव्हा आपल्या मुलांच्या आरोग्यावर याचे काय परिणाम होतील, या विचाराने त्यांचे मन हेलावले. त्या एका विचाराने आम्हाला कृषी पर्यटनाकडे वळण्यास प्रवृत्त केले. वि. स. खांडेकर यांच्या 'ययाती' कादंबरीने माझ्या विचारांना नवी दिशा दिली आणि आम्ही कोकणातील आपल्या जमिनीवर कृषी पर्यटनाचा प्रयोग यशस्वी केला."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​अन्नाच्या दर्जाबाबत बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली. "आपण अन्न निवडून घेत नाही. समाजात अन्नाबद्दल पुरेशी चर्चा किंवा जागरूकता नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही ८ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये अन्नाबद्दल आवड निर्माण करत आहोत, जेणेकरून भविष्यात ते 'अन्नदाते' बनतील. आज शेती सोडून सर्वजण धंदे ,नोकरीकडे वळत आहेत, ही चिंतेची बाब आहे. भविष्यात सकस अन्न कोठे मिळेल, हा मोठा प्रश्न असेल. म्हणूनच अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी," असेही त्यांनी ठामपणे मांडले.

टाइम्स स्पेशल

साहित्य क्षेत्राबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, "नवीन लेखकांनी तोचतोचपणा टाळून नाविन्यपूर्ण लेखन करावे. नवीन साहित्यिकांचे वाचन वाढले पाहिजे. साहित्याप्रमाणेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वाचनाचा आणि अनुभवाचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे." ​कार्यक्रमाच्या शेवटी, त्यांनी आपल्या अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका अशा प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. अनेक संकटांवर मात करून आज त्यांचे कृषी पर्यटन क्षेत्रात काम सुरू असून पर्यटकांचाही याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg