loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी बाजारपेठेत पर्यटकांच्या कारचा पादचारी महिलेला धक्का; महिला किरकोळ जखमी

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांमुळे सिंधुदुर्गातील रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच गर्दीतून प्रवास करणार्‍या कर्नाटक पासिंगच्या एका भरधाव कारने आज दुपारी साटेली भेडशी बाजारपेठेत पिकुळे येथील एका पादचारी महिलेला जोराचा धक्का दिला. या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली आहे. आज दुपारी साटेली भेडशी बाजारपेठेत नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. दरम्यान, गोव्याच्या दिशेने जाणार्‍या केए ०३ एमएक्स ४७८७ या क्रमांकाच्या ह्युंडाई कारने रस्ता ओलांडणार्‍या पिकुळे येथील एका महिलेला धडक दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघात होताच परिसरातील स्थानिक व्यापारी आणि नागरिक तातडीने मदतीला धावून आले. सुदैवाने महिलेला मोठी दुखापत झाली नसली तरी किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर कार चालकाने पळ काढू नये यासाठी स्थानिकांनी कारला थांबवले. अपघातग्रस्त महिलेला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यासाठी आणि तिच्या औषधोपचाराचा खर्च उचलण्यासाठी स्थानिकांनी कार चालकाला बजावले. त्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सिंधुदुर्गमार्गे गोव्याकडे जाणार्‍या पर्यटकांच्या गाड्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक पर्यटक अरुंद रस्ते आणि बाजारपेठेचा विचार न करता भरधाव वेगाने गाड्या चालवत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg