loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इच्छुक जिल्हा परिषद/पंचायत समिती उमेदवरांच्या मुलाखती उत्साहात

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संघटनात्मक तयारीला वेग देण्यात आला आहे. याच अनुषंगाने आमदार शेखर निकम संपर्क कार्यालय, देवरुख येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जेष्ठ पदाधिकारी पक्ष निरिक्षक विजयराव (अप्पा) गुजर आणि संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांनी घेतल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, महायुतीच्या माध्यमातून अथवा वेळप्रसंगी स्वबळावर निवडणूक लढवावी लागल्यास त्यासाठी आतापासूनच सज्ज राहण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबवण्यात आली. इच्छुक उमेदवारांनी कोणतीही वेळ न दवडता संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क आणि तयारीला लागावे, असे स्पष्ट निर्देश पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या निवडणुका आमदार शेखर निकम यांच्या सक्षम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली लढवण्यात येणार असून, “राजकारणात अनुभवातून शहाणपण येते. त्यामुळे ताकच नव्हे तर पाणीही फुंकून प्या,” असा मौलिक कानमंत्र आमदार शेखर निकम यांनी यापूर्वीच कार्यकर्त्यांना दिला आहे.

टाइम्स स्पेशल

त्याच मार्गदर्शनानुसार पक्ष सर्व पातळ्यांवर काळजीपूर्वक व नियोजनबद्ध तयारी करत आहे. यावेळी प्रत्येक गट व गणातील इच्छुक उमेदवार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध, सकारात्मक आणि संघटन मजबूत करणारी ठरली असल्याचे चित्र दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg