loader
Breaking News
Breaking News
Foto

"गुहागरचा विकास हाच माझा ध्यास".... नगराध्यक्ष नीता मालप

वरवेली (गणेश किर्वे) - माझ्यावर जो जनतेने विश्वास दाखविला आहे, तो मी पूर्ण करेन सगळ्यांनाच विश्वासात घेऊन गुहागर नगरीचा विकास करणार असून गुहागर नगरीचा विकास हा एकच ध्यास समोर ठेवून मी काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष नीता मालप यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार कार्यक्रम गुहागर नगरपंचायत हॉलमध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष नीता मालप पुढे म्हणाल्या की, येथे येतेवेळी पक्षाचे झेंडे सर्वांनीच बाजूला ठेवावे आपण येथे फक्त गुहागर नगरीचा विकास करण्यासाठी आलेले आहोत. आपल्याला काम करायची आहेत उत्कृष्ट दर्जाची. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम करून आदर्श निर्माण करूया असे शेवटी त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माजी आमदार विनय नातू म्हणाले की, एक चांगले आदर्शवत नगरपंचायत बनवूया त्यासाठी सर्वांनीच चांगले प्रयत्न करावे. या राज्यात सत्ता महायुतीची असून विकास निधी कधीच कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर राजेश बेंडल यांनी निवडणुकीपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर सभेत सर्वतोपरी मदत सर्वांगीण विकास साठी मदत करण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आजही दूरध्वनीवरून नूतन नगराध्यक्षांचे अभिनंदन करून गुहागर नगरीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आश्वासन दिले असल्याचे सांगितले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिंदे सेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर तालुका भाजपा अध्यक्ष अभय भाटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगळे, प्रांजली कचरेकर नवनिर्वाचित नगरसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg