loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि इंग्लिश मिडियम स्कूल, भेडशी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

साटेली (प्रतिनिधी) - धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई- संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कला - वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, भेडशी आणि इंग्लिश मिडियम स्कूल, भेडशी चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी प्रशासकीय अधिकारी व सिडको नवी मुंबई माजी सल्लागार मोहन गवस यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण आणि द्विपप्रज्वल करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छाया स. धणें (सरपंच ग्रा.पं.साटेली भेडशी), न्यू इंग्लिश स्कूल व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय भेडशी प्राचार्य तथा सहसचिव-समन्वय समिती, धी.बां.न.शि. प्र. मं. मुंबई नंदकुमार नाईक, मोहन पांगम (ज्येष्ठ माजी शिक्षक, रा. वि. कुडासे), वृषाली करमळकर (ज्येष्ठ माजी शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल भेडशी), सीमा देऊलनकर (ज्येष्ठ मुख्य शिक्षा, शां. मा. वि. पिकुळे), निवृत्ती कांबळे (ज्येष्ठ मुख्य शिक्षक, शां. मा. वि. पिकुळे), संजय उसपकर (उद्योजक परमे), फातर्पेकर, माजी विस्तार अधिकारी दीपा दळवी, देविदास कोरगावकर, सुभाष बोन्द्रे, पंढरीनाथ देऊलकर, भाऊ टोपले, अनिल मोरजकर, प्रमोद खानोलकर, मंदार फातर्पेकर, बाबी देसाई, माजी सैनिक मधुकर लोंढे, मंडळ अधिकारी कांचन गवस, राजश्री पाटील, पागम, एस. एन. देसाई, कर्पे, शंकर राठोड, एच. आर.सावंत, भिसे, देऊलकर, भोगले दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नदीप गवस, शंकर जाधव, तेजस गवस सह आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व कला - वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, भेडशी आणि इंग्लिश मिडियम स्कूल, भेडशीच्या वतीने मोहन गवस, छाया धर्णे, मोहन पागम, वृषाली करमळकर, फातर्पेकर, सीमा देऊळकर, दीपा दळवी, देविदास कोरगावकर, एन. पी. कांबळे, संजय उसपकर, समन्वय समितीचे सदस्य सुभाष बोन्द्रे, एस. एन. देसाई, प्रमोद खानोलकर, रत्नदीप गवस, तेजस देसाई, शंकर जाधव, कांचन गवस, मधुकर लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नंदकुमार नाईक यांनी केले तर शैक्षणिक व सांस्कृतिक अहवाल शंकर राठोड वार्षिक, ऋणनिर्देश श्रीमती गावडे, क्रीडा अहवाल एच आर सावंत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg