loader
Breaking News
Breaking News
Foto

समाधानकारक उत्तर न आल्यास थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचा साखळी उपोषणाचा इशारा

रत्नागिरी : येथील थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या प्रमुख मागण्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कोणती कार्यवाही केली हे जाणून घेण्यासाठी आज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेतली. निवासी जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात आठ दिवसांत माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले; मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर समितीच्या वतीने येत्या प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषण करण्याचा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दोन मुख्य मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले होते. यामध्ये पहिली मागणी होती थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या आरक्षित १७.५० गुंठे जागेमध्ये जे कम्युनिटी सेंटरचे बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते बांधकाम रद्द करावे आणि दुसरी मागणी होती थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची आरक्षित असलेली १७.५० गुंठे जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळावी.

टाईम्स स्पेशल

हे निवेदन देऊन दोन महिने होऊन गेले, तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संघर्ष समितीस कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे लेखी उत्तर मिळालेले नाही. म्हणून थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या शिष्ठमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्या निवेदनावर काय कार्यवाही केली याबाबत विचारणा केली. त्यावर निवासी जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसांत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. आठ दिवसांत जर का प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने येत्या प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषण करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात एल. व्ही. पवार, किशोर पवार, अमोल जाधव, सुनील आंबुलकर, दीपक जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र कांबळे, दिवेन कांबळे, बी. के. पालकर, अजित जाधव, प्रदीप पवार, तुषार जाधव, मिलिंद सावंत, राजन जाधव, शिवराम कदम आदींचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg