loader
Breaking News
Breaking News
Foto

स्मार्ट वीज मीटरबाबत व्यापारी संघटनेने घेतली आक्रमक भूमिका, नागरिकांच्या तक्रारी एकत्र करण्यास सुरूवात

लांजा (संतोष कांबळे) - संपूर्ण राज्यात महावितरणतर्फे घरगुती आणि व्यावसायिक ठिकाणी स्मार्ट वीज मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आलेले असले तरी या स्मार्ट वीज मीटरविरुद्ध लांजा शहरातील लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान लांजा व्यापारी संघटनेने स्मार्ट वीज मीटरविषयी आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांकडून तक्रारी जमा करण्यास सुरूवात केली आहे. लांजा शहरातील तसेच जवळच्या गावातील प्रत्येक ठिकाणी म्हणजे वाडी वस्तीतील घरे, बाजारपेठेतील दुकाने यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे महावितरणचे कर्मचारी आणि स्मार्ट मीटर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी येऊन स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे असे सांगत आहेत. एवढेच नव्हे तर ते जबरदस्तीने वीज मीटर बसवून जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळेच लांजा व्यापारी संघटनेने स्मार्ट वीज मीटर बसविण्यासाठी जबरदस्ती करू नये अशी आग्रही भूमिका घेतली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन स्मार्ट वीज मीटर बसविण्याकरिता व्यापारी संघटनेचा विरोध नोंदवला आहे. व्यापारी संघटनेने यासंदर्भात एक तपशीलवार निवेदन सादर अनेक मुद्यांचे स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामध्ये वीज बिलाची छापील प्रत मिळणे आवश्यक असताना सद्या ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आलेले आहेत; तेथे स्मार्ट मीटरच्या वीज बिलाची छापील प्रत येत नसल्याचे व्यापारी संघटनेने त्यांना कळविले आहे. याशिवाय वीज मीटर रिडींग घेण्यासाठी कर्मचार्‍यांनी येणे बंधनकारक असले पाहिजे. छापील बिलावर स्कॅनर असायला पाहिजे. ३ महिन्यांसाठी १० मीटर ट्रायल बेसवर बसविणे. चुकीचे अथवा वाढीव बिल आल्यास बिलामध्ये ऍडजेस्टमेंट करता येण्यासारखे सुविधा असणे आवश्यक असल्याचे व्यापारी संघटनेने म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

जी कंपनी स्मार्ट वीज मीटर बसविणार आहे त्याचे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. नवीन वीज मीटर बसविताना त्याचे चार्जेस आकारले जाणार आहेत का? नवीन वीज मीटर बंद पडल्यास दुसरा मीटर बसविताना किती चार्जेस आकारणार असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अशा विविध प्रश्नांसाठी व्यापारी संघटनेच्या माध्यमातून महावितरणकडे मागणी केलेली आहे. सदरहु मागण्यांबाबत समाधानकारक खुलासा प्राप्त झाल्यावरच लांजे शहरात स्मार्ट मीटर बसविण्याकरीता विचार केला जाईल असे संघटनेकडून महावितरण व संबंधित कंपनीला सांगण्यात आले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे, असा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न सुभाष शेट्ये यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg