loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीकरांना अभिप्रेत विकास साधण्यासाठी सर्व सहकारी नगरसेवकांसोबत प्रयत्नशील राहू - नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे

रत्नागिरी : रत्नागिरीकरांना अभिप्रेत विकास साधण्यासाठी सर्व सहकारी नगरसेवकांसोबत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदग्रहण सोहळ्यावेळी केले. विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत ही दोन्ही मुले अपेक्षित सर्व सहकार्य करतील अशी ग्वाही उद्योजक रविंद्र उर्फ आण्णा सामंत यांनी याप्रसंगी बोलताना दिली. नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी रत्नागिरी नगर परिषदेतील नगराध्यक्ष दालनात आसन ग्रहण केले. त्यानंतर सभागृहात झालेल्या सोहळ्यात नगराध्यक्षांनी रत्नागिरीकरांना विकासाबाबत आश्वस्त केले. रत्नागिरीचा गाडा चालवताना अभिप्रेत विकासासह रस्ते, पाणी, वीज अशा सर्वच गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. शहराच्या विकासाचा आलेख चढताच राहिल असा विश्वासही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नूतन नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आ.किरण सामंत यांचे पिताश्री आण्णा सामंत उपस्थित होते. लोकप्रतिनिधी असलेल्या दोन्ही मुलांकडून नूतन नगराध्यक्षांना रत्नागिरीच्या विकासासाठी लागणारे सर्व सहकार्य मिळेल, याची ग्वाही आण्णा सामंत यांनी दिली. रत्नागिरी शहर पूर्णपणे नावारूपाला येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात नूतन नगराध्यक्षांनी नगर परिषदेतील नगराध्यक्षा दालनात सोमवारी सकाळी 10.00 वाजता आसन ग्रहण केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या महिलावर्गाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. यावेळी शिवसेना-भाजप युतीसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवकही उपस्थित होते. सभागृहात झालेल्या सोहळ्यावेळी सर्व प्रभागनिहाय नगरसेवकांचाही नगराध्यक्षांकडून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांचा संयुक्तपणे सत्कार केला.

नगरपरिषदेचे अधिकारी जितेंद्र विचारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना प्रशासनाचे सहकार्य मिळण्याची ग्वाही दिली. सभागृहातील शुभेच्छा कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे शहर अध्यक्ष बिपीन बंदरकर यांनी केले. यावेळी त्यांनी पारदर्शकपणे सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी सभागृहातील वातावरण भगवे झाले होते. शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे गमजे परिधान केले होते. रत्नागिरी नगर परिषदेवर 3 जानेवारी 2021 पासून प्रशासक आले. त्या वेळेपासून नगरपरिषदेचा सर्व कारभार प्रशासक असलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या हातात होता. आता सर्व कारभार नूतन नगराध्यक्षा आणि नगरसेवकांच्या ताब्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg