loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पोलीस दलाकडून ‘मिशन जीवन’ अंतर्गत जेष्ठ नागरिकांचा अनोखा वाढदिवस साजरा

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ‘मिशन जीवन’ या उपक्रमांतर्गत दिनांक १ जानेवारी रोजी वाढदिवस असलेल्या लांजा व संगमेश्वर तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिकांचा अनोखा व भावनिक वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी लांजा व संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील, ज्यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी येतो, अशा जेष्ठ नागरिकांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘मिशन जीवन’ अंतर्गत हा कार्यक्रम वेरळ व गवाणे-लांजा येथील सभागृहात तसेच आंबेड खुर्द–संगमेश्वर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास लांजा पोलीस ठाणे हद्दीतील १७७ तर संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील ३०० जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष प्रसंगी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते सर्व जेष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन व केक कापून एकत्रितपणे वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक बी. व्ही. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम, पोलीस निरीक्षक नीलकंठ वगळे (लांजा), पोलीस निरीक्षक श्री. राजाराम चव्हाण (संगमेश्वर), पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, होमगार्ड्स तसेच नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमादरम्यान अनेक जेष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याचे सांगितले. पोलीस दलाकडून मिळालेल्या या सन्मानामुळे आपणास आधार व सुरक्षिततेची भावना मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षाही जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ‘मिशन जीवन’ या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करत जेष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेतल्या व त्यांचे निरसन करण्यासाठी जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे आणखी एक भावनिक आकर्षण म्हणजे वेरळ–लांजा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे पाय पाण्याने धुऊन त्यांचे आशीर्वाद घेत समाजात जेष्ठ नागरिकांविषयी सकारात्मक संदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg