loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएमश्री दत्त विद्या मंदिर तालुका स्कूल वैभववाडी माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन माईणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) - पीएमश्री दत्त विद्या मंदिर तालुका स्कूल वैभववाडी माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन माईणकर, उपाध्यक्षपदी वर्षा पवार मोहिते, खजिनदारपदी तेजस आंबेकर तर सचिवपदी मुख्याध्यापक दिनकर केळकर यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. पीएमश्री दत्त विद्यामंदिर तालुका स्कूल वैभववाडीचे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच शाळेच्या सभागृहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा, नगरसेविका नेहा माईणकर, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस साळुंखे, माजी अध्यक्ष संजय शेळके, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष माजी विद्यार्थी तेजस आंबेकर, वर्षा पवार मोहिते, माजी नगरसेवक माजी विद्यार्थी संतोष माईणकर, दत्ता माईणकर, राजा गजोबार नर, राजू जाधव, उपशिक्षिका धावले, आवटे आजी-माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

पीएमसी दत्त विद्या मंदिर शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी या मेळाव्यामध्ये कथन केल्या. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार मुख्याध्यापक दिनकर केळकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg