loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषद शिवसेना गटनेते व पक्षप्रतोदपदी निकेतन पाटणे यांची नियुक्ती

खेड - खेड नगरपरिषदेत शिवसेना गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली असून, नगरसेवक निकेतन उर्फ बापू पाटणे यांची शिवसेनेच्या गटनेते व पक्षप्रतोदपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. नगरपरिषदेत पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी पाटणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांची या महत्त्वाच्या पदांवर निवड केली. निकेतन उर्फ बापू पाटणे हे नगरपरिषदेत सक्रिय, अभ्यासू आणि जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे नगरसेवक म्हणून ओळखले जातात. शहरातील मूलभूत सुविधा, नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, तसेच विकासकामांबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडीनंतर बोलताना पाटणे यांनी शिवसेना नेतृत्व, सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि नगरपरिषदेत शिवसेनेची ठाम व सकारात्मक भूमिका मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शक कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि विकासाभिमुख धोरणे राबवण्यासाठी शिवसेना गट एकसंघपणे काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी निकेतन उर्फ बापू पाटणे यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली खेड नगरपरिषदेत शिवसेनेचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जाईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg