loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर किशोरी पेडणेकरांना ठाकरेंनी उमेदवारी दिली

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा सुरू असताना आणि त्यांच्या प्रभागात शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांच्या पत्नी अबोली खाड्ये यांनी दावा सांगितल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु त्यांनी सुवर्णमध्य काढत प्रभाग क्रमांक १९९ मधून किशोरी पेडणेकर तर प्रभाग क्रमांक १९८ मधून अबोली खाड्ये यांना उमेदवारी दिली आहे. मुंबईतील अनेक प्रभागांत अनेक आजी माजी पदाधिकार्‍यांनी दावा सांगितल्याने उमेदवारी देताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चांगलाच कस लागला. दादर, माहीम, लालबाग परळ, वरळी आदी मराठी बहुल भागांत उमेदवारीसाठी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. गेल्या दोन चार दिवसांपासून उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. अखेर अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रभाग क्रमांक १९९ चे प्रतिनिधित्व किशोरी पेडणेकर करतात. याच प्रभागातून निवडून येत त्या मुंबईच्या महापौर देखील राहिल्या. परंतु या भागातील शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांची पत्नी अबोली खाड्ये यांनी यंदा दावा सांगितला होता. गेली ३५ वर्षे आम्ही काम करतोय, यंदा आम्हाला न्याय हवा म्हणत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीचे काय होणार? असा पेच निर्माण झाला होता. अखेर शेजारील प्रभागात म्हणजेच १९८ मधून अबोली खाड्ये तर १९९ मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १९६ मधून आशिष चेंबूरकर यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाग क्रमांक १९९ चे प्रतिनिधित्व किशोरी पेडणेकर करतात. याच प्रभागातून निवडून येत त्या मुंबईच्या महापौर देखील राहिल्या. परंतु या भागातील शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांची पत्नी अबोली खाड्ये यांनी यंदा दावा सांगितला होता. गेली ३५ वर्षे आम्ही काम करतोय, यंदा आम्हाला न्याय हवा म्हणत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीचे काय होणार? असा पेच निर्माण झाला होता. अखेर शेजारील प्रभागात म्हणजेच १९८ मधून अबोली खाड्ये तर १९९ मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १९६ मधून आशिष चेंबूरकर यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असतील.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg