loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत एकाच प्रभागात शिवसेनेचे दोन उमेदवार; महायुतीत संभ्रम की रणनीती?

मुंबई. : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, शिवसेनेच्या गोटातून एक धक्कादायक चित्र समोर आली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 204 मधून शिवसेनेचे दोन उमेदवार एकाचवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.प्रभाग क्रमांक 204 मधून अरूण दळवी आणि अनिल कोकीळ या दोघांनीही शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या वेळी भाजपच्या आमदार चित्रा वाघ उपस्थित होत्या. त्यामुळे ही चूक आहे की मुद्दाम आखलेली रणनीती, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकाच प्रभागात दोन उमेदवार असल्यामुळे आता नेमका कोण माघार घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत जवळ येत असताना, महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा मोठा कस लागणार आहे. वेळेत निर्णय झाला नाही, तर मतांचे विभाजन होऊन थेट विरोधकांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक पातळीवर दोन्ही उमेदवारांचे समर्थक सक्रिय झाल्याचं चित्र असून, यामुळे शिवसेनेच्या गोटातही अस्वस्थता वाढली आहे.पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही जण याकडे ‘सेफ गेम’ म्हणून पाहत असून, शेवटच्या क्षणी एक उमेदवार माघार घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, भाजप आमदार चित्रा वाघ यांची दोन्ही उमेदवारांच्या अर्जावेळी उपस्थिती ही बाब अधिक चर्चेची ठरत आहे. महायुतीत सर्व काही ठरलं आहे की अजूनही जागावाटप आणि उमेदवारीवर संभ्रम कायम आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg