loader
Breaking News
Breaking News
Foto

संभाव्य दुबार मतदारांची छाननी पूर्ण, 67 हजाराहून अधिक मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह हटविणार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीची पडताळणी करुन संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 83 हजार 645 संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली. मतदारयादी पडताळणीत 67 हजार 071 मतदारांची नावे व फोटो एकमेकांशी जुळत नाहीत. अर्थात सदर मतदार 'दुबार मतदार' नाहीत. त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील स्टार (**) चिन्ह हटविण्यात येणार आहे. यामुळे या मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान मतदार यादीत नाव व फोटो पूर्णतः समान असलेले 16, हजार 574 मतदार प्रत्यक्ष दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मतदारांच्या नावासमोर स्टार (**) चिन्ह कायम ठेवण्यात येणार असून, सदर मतदारांच्या नावापुढे 'दुबार मतदार' असा शिक्का मतदार यादीत असणार आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रावर विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून देऊन मतदान करता येईल. दुबार मतदान टाळण्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित मतदाराने आपण एकाच ठिकाणी आणि एकदाच मतदान करीत असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश ‍बिरारी यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, दुबार व बनावट मतदानास आळा घालणे तसेच पात्र मतदाराचा हक्क सुरक्षित ठेवणे, या उद्देशाने ही छाननी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मतदार यादी अचूक व दोषमुक्त असणे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने, प्रशासनाकडून ही कार्यवाही काटेकोरपणे करण्यात येत आहे. या सुधारणांमुळे ठाणे महानगरपालिका निवडणूक अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg