loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.कुणकेरी शाळा नं.१ मध्ये भेटवस्तू वाटप कार्यक्रम

सावंतवाडी - विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार केला तर शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते व त्या ऊर्जेतून सकारात्मक कामे घडत जातात व आपल्याला यशाची शिखरे गाठायची संधी मिळते, असे प्रतिपादन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी कुणकेरी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा एक मध्ये शाळेला भेट वस्तू देण्याच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विशेष सरकारी वकील कै. श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते, कोकण प्रांताचे रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर यांनी शाळेला जादम भेट स्वरूपात दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपला सर्वात पहिला गुरु हे आपले आई वडील असतात. सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर त्यांच्या पायाला स्पर्श करून पहिले दर्शन घ्या, नंतर देवाची पूजा करा, यातून तुम्हाला जी सकारात्मक ऊर्जा मिळेल त्यातून सगळे सकारात्मक घडत जाईल. तुम्हाला अशक्य असणारी गोष्टही शक्य होईल असे सांगून ज्या आईने आपल्याला जन्म देऊन हे जग दाखवले त्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू यायला देऊ नका. जर आई-वडिलांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आले तर आपल्याला यश कधीच मिळणार नाही आणि जर सुखाचे अश्रू आले तर यशाची शिखरे तुम्ही गाठत रहाल, असे स्पष्ट करून जिद्द, चिकाटी, मेहनत, अंगी असली म्हणजे सर्व काही शक्य होते असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर यांनी आपले भाऊ कै.ऍड.श्रीधर पराडकर यांनी अनेक गरजवंतांना मदत केली. त्यांचा सामाजिक कार्याचा वसा आम्ही पुढे निरंतरपणे सुरू ठेवला आहे, ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी पराडकर कुटुंबीय निश्चितच असेल असा विश्वास दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg