loader
Breaking News
Breaking News
Foto

खेमदेव विकास मंडळ निगडे (मुंबई) यांच्यावतीने ‘वीर रत्न बाजीप्रभू’ एकांकिकेचे प्रभावी सादरीकरण

दापोली(प्रतिनिधी) : श्री खेमदेव विकास मंडळ निगडे (मुंबई) यांच्या वतीने रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘वीर रत्न बाजीप्रभू’ ही ऐतिहासिक एकांकिका उत्साहात सादर करण्यात आली. या एकांकिकेमध्ये स्वराज्याचे निष्ठावंत सुभेदार वीर रत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यपूर्ण जीवनगाथेचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले. आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या कथा वाचायला मिळाल्या; मात्र या एकांकिकेमुळे तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवता आला. एकांकिकेतील कथालेखन व संवादरचना अतिशय दर्जेदार असून प्रत्येक शब्द प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा होता. अनेक क्षणी प्रेक्षक स्वतः त्या ऐतिहासिक काळात गेल्याचा अनुभव घेत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ दोन तासांच्या कालावधीत कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न, बाजीप्रभूंचे अपार शौर्य आणि स्वराज्यासाठी मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचे प्रभावी दर्शन घडवले. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत सत्यात उतरवली, हे या एकांकिकेत ठळकपणे मांडण्यात आले. ही एकांकिका साकार करणाऱ्या सर्व कलाकारांचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मधुकर रेवाळे, प्रमुख पाहुणे माजी सभापती चंद्रकांत दादा बैकर, उपाध्यक्ष दिनेश रेवाळे, प्रवीण तांदळे, सचिव वसंत रेवाळे, उपसचिव संतोष रेवाळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सल्लागार समिती तसेच गावातील मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg