loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुती आमने-सामने

मुंबई - महाराष्ट्रातील आगामी पालिका निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण तापले असून, विविध महापालिकांमध्ये बहुपक्षीय लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातल्या एकूण 29 पालिकांपैकी 11 ठिकाणी महायुती एकत्रितपणे लढणार आहे, तर 18 ठिकाणी प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि ठाणे या प्रमुख महापालिकांमध्ये चौरंगी लढत निश्चित झाली आहे. मुंबई ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र असून, तिला मनसेची देखील साथ आहे. नवी मुंबई, सोलापूर, जालना आणि उल्हासनगरमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. येथे चौरंगी लढत अपेक्षित असून, मुख्य सामना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती विरुद्ध भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात होणार आहे. भाजप, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि रिपाइं यांची आघाडी झाली आहे. यात शिंदे गटाला 90 जागा, भाजपला 137 जागा मिळाल्या आहेत, तर रिपाइंला भाजपच्या कोट्यातून जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप यांनी देखील आघाडी केली आहे. काँग्रेस 139, वंचित बहुजन आघाडी 62 आणि रासप 10 जागांवर लढणार आहे. याशिवाय, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. या आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 164 जागा, मनसेला 53 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गट मात्र स्वतंत्रपणे अंदाजे 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg