loader
Breaking News
Breaking News
Foto

चेन्नई येथे जेसीआय इंडिया कडून जेसीआय खेडला ‘आउटस्टँडिंग बिझनेस’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

खेड (दिलीप देवळेकर) - चेन्नई येथे पार पडलेल्या जेसीआय इंडिया नॅशनल परिषद २०२५ मध्ये जेसीआय खेड यांना ‘आउटस्टँडिंग बिझनेस’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जेसीआय खेड २०२५ चे अध्यक्ष अमर दळवी यांना जेसीआय इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष जेएफएस अंकुर झुनझुनवाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर पुरस्कार वितरण सोहळा ग्रॅंड छोला हॉटेल ,चेन्नई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमास जेसीआय जगाचे अध्यक्ष केसुके शिमोयेमाडा , जेसीआय इंडिया झोन ११ चे २०२५ चे अध्यक्ष शाबा गावस, २०२६ च्या ममता नाईक , विभागिय अध्यक्ष तसेच देशभरातील विविध जेसीआय लोकल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व सभासद मोठ्या संख्येच्या उपस्थितीत पार पडला . या राष्ट्रीय सन्मानामुळे जेसीआय खेडमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण टीमने केलेल्या व्यावसायिक व सामाजिक उपक्रमांच्या यशाची ही पावती असल्याची भावना व्यक्त करण्यात आली तसेच हा पुरस्कार जेसीआय खेडच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg