loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलतर्फे घेण्यात आलेल्या रोटरी स्कॉलरशिप कम एन्ट्रन्स टेस्ट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड - (प्रतिनिधी) - रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडतर्फे रोटरी स्कॉलरशिप कम एन्ट्रन्स टेस्ट (RSCET) या परीक्षेचे आयोजन महाड, रत्नागिरी, खेड व चिपळूण या ठिकाणी करण्यात आले होते. या परीक्षेमध्येे विविध शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत दोन करोड रुपयांपेक्षा जास्त स्कॉलरशिप देणारी तसेच हुशार व गरजू मुलांना मोफत शिक्षण देणारी कोकणातील एकमेव संस्था म्हणजेच रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल होय. आयआयटी, एनआयटी तसेच नामांकित शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमार्फत स्कॉलरशिप मिळविण्याची सुवर्णसंधी रोटरी स्कॉलरशिप कम एन्ट्रन्स टेस्ट (RSCET) परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे व त्यातील उच्च गुण मिळविणाऱ्या काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या स्वरुपात इ. अकरावी सायन्स करिता रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यास फीमध्ये सवलत देण्यात येईल, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी रोटरी ॲकॅडमीतील जे.ई.ई. मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, सी.ए. फाउंडेशन, बी.आर्च., सी.एस. ई.ई.टी. यांसारख्या प्रवेश परीक्षा तयारीच्या स्वतंत्र बॅचमध्ये प्रवेश मिळवू शकतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही परीक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जे विद्यार्थी दि. 28 डिसेंबर 2025 रोजी ही परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड मो. नं. 8208971189, 8552028802 या ठिकाणी संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg