loader
Breaking News
Breaking News
Foto

समर्थांच्या नामात भक्तगण निघाले न्हावून, हिंदूराज मंडळाच्यावतीने पायी दिंडीचे आयोजन

खेड - खेड येथील हिंदूराज मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेड ते कशेडी येथील स्वामी समर्थ मंदिर अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी सहा वाजता भरणे येथील श्री काळकाई देवी मंदिरातून ही पायी दिंडीची सुरुवात करण्यात आली. स्वामी समर्थांच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला. भक्तांचा उत्साह भर उन्हात देखील ओसंडून वाहत होता. सजवलेली पालखी आणि हाती भगव्या पताका घेतलेले वारकरी हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. दुपारी स्वामींची पालखी कशेडी घाटमाथ्यावर आल्यानंतर जमलेल्या भाविकांनी एकत्र येत गोल रिंगण करत स्वामींची पालखी नाचवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इंग्रजी वर्षातील पहिलाच गुरुवार असल्याने सकाळपासूनच मंदिरात भक्तगणांची रीघ सुरू होती. दुपारी पायीवारीतून आलेल्या भक्तगणांसह सगळ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान, गुरुवारी मंदिरात सिद्धी वानखेडे यांच्या स्वरसिद्धी संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आलेल्या भक्तगणांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. गेली १७ वर्षे हिंदूराज मित्रमंडळाने ही परंपरा सातत्याने जपली असून, यामुळे परिसरातील आध्यात्मिक वातावरण अधिक वृद्धिंगत झाले आहे, अशी माहिती खेड येथील नगरसेवक आणि मंडळाचे पदाधिकारी सतीश चिकणे यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg