loader
Breaking News
Breaking News
Foto

रसायनी पोलिसांचा मोठा ब्रेकथ्रू..! परराज्यातील ‘धार गँग’चा पर्दाफाश; घरफोडीतील सोनं-रोख रक्कम जप्त

रसायनी (राकेश खराडे) - रिसगाव व एमआयडीसी कॉलनी, मोहोपाडा परिसरात सलग झालेल्या घरफोडी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर रसायनी पोलिसांनी परराज्यातील कुख्यात ‘धार गँग’चा पर्दाफाश करत मोठं यश मिळवलं आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी रसायनी पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर, पोलिस उपनिरीक्षक मंगेश वाचकर व रसायनी पोलिसांचे कौतुक केले. मध्यप्रदेशसह अनेक राज्यांत सक्रिय असलेल्या या टोळीतील आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपयांचे सोनं-रोख दागिने आणि चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणात रसायनी पोलीस ठाण्यात दाखल चार घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपी दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून फ्लॅटमध्ये घुसखोरी करत सोनं व रोख रक्कम लंपास करत होते. घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी निर्णायक ठरले. फुटेजच्या आधारे तपास थेट मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यापर्यंत पोहोचला. पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर यांच्या पथकाने बगोली (ता. कुक्षी, जि. धार) येथे धाड टाकून प्रकाश आलवा याला अटक केली. चौकशीत त्याच्याकडून घरफोडीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच या टोळीतील दुसरा मुख्य आरोपी सुरेश शेंगर हा कर्नाटक कारागृहात अटकेत असल्याचे उघड झाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. यात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश माळी, पोलिस एएसआय कोलेकर, रणजित खराडे, अनंता थोरात, सुशांत पिंगळे, संतोष म्हात्रे, गिरीश नगरकर, होळे, रुषी पवार आदींनी कारवाई केली. दरम्यान, घरफोडी व चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सोसायट्या व इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच संशयित हालचाली आढळल्यास तात्काळ डायल ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg