loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत महायुतीतून रामदास आठवले बाहेर; रिपाइंकडून 39 उमेदवारांची घोषणा

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच रिपाइं (आठवले) कडून मुंबईतील तब्बल 39 प्रभागांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महायुतीतील जागावाटपात रिपाइंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. “महायुतीत आम्हाला योग्य सन्मान आणि अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असं आठवले म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माहितीनुसार, रिपाइंने महायुतीकडे मुंबईत सन्मानजनक जागावाटपाची मागणी केली होती. मात्र अंतिम चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने रिपाइंने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीच्या गणितांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, विशेषतः दलित आणि वंचित मतदारांमध्ये रिपाइंची असलेली पकड लक्षात घेता. रिपाइं (आठवले) कडून जाहीर करण्यात आलेल्या 39 उमेदवारांच्या यादीत उत्तर मुंबई, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील प्रभागांचा प्रामुख्याने समावेश आहे. “आमचे उमेदवार तळागाळातील प्रश्न घेऊन मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिकेत रिपाइंची स्वतंत्र ताकद दाखवून देऊ,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

रामदास आठवले हे राष्ट्रीय पातळीवर भाजपचे घटक पक्ष मानले जात असले, तरी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी घेतलेला हा निर्णय महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. विशेषतः काही प्रभागांत मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून त्याचा फायदा विरोधकांना मिळू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg