loader
Breaking News
Breaking News
Foto

३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटकांची रत्नागिरी, सिंधुदुर्गला पसंती

रत्नागिरी (टाइम्स डेस्क) - सन २०२५ आणि सन २०२६ निमित्त आज रत्नागिरीत मोठ्या संख्येने पर्यटक आलेले दिसून येत आहेत. ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी राज्यातील पर्यटकांनी रत्नागिरीला पसंती दिली असल्याचे दिसून येते. रत्नागिरी नजीकचे गणपतीपुळे, आरे-वारे, काळबादेवी, भगवती किल्ला येथील शिवसृष्टी, भाट्ये किनारा, पावस स्वामी स्वरुपानंद मंदिर, आडीवरे येथील श्री महालक्ष्मी मंदिर, पूर्णगड व गावखडीचा किनारा, कशेळी किनारा याठिकाणी मोठ्या संख्येने आलेले पर्यटक दिसून येतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समुद्र किनारा हा स्वच्छ किनारा म्हटला जातो. त्यामुळे गोव्यापेक्षा पर्यटकांनी रत्नागिरी, सिंधुुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्‍वर, मालवण, वेंगुर्ले, गुहागर, दापोली याठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे स्थानिक निवास व्यवस्था हाऊसफुल्ल झाल्याचे म्हटले जात आहे. दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात यंदा पर्यटक कोकणात आले आहेत. घाटमाथ्यावर थंडीचे प्रमाण जास्त असल्याने पर्यटकांनी कोकण निवडले आहे. यंदा मासेमारी ही जास्त होत असल्याने मासे खाणार्‍या खवय्यांची ही चंगी झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg