loader
Breaking News
Breaking News
Foto

पिंपरीत महायुतीला मोठा धक्का, भाजप-शिंदे गटाचे अनेक उमेदवार बाद; निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप

पुणे- महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच अनेक राजकीय पक्षांना मोठे धक्के बसत असल्याचं चित्र आहे. मुंबईनंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपचे तीन आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरवण्यात आले आहेत. या घडामोडीमुळे युतीतील दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या मतदारसंघात येतो. युती असूनही भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने या प्रभागात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एबी फॉर्म उशिरा सादर झाल्यामुळे विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला आणि आजच्या छाननीत हे सर्व फॉर्म बाद ठरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर हे पाचही एबी फॉर्म निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आले होते. याच मुद्द्यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप नोंदवला होता. छाननीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी हे आक्षेप मान्य करत एबी फॉर्म बाद केले. त्यामुळे आता संबंधित उमेदवारांना पक्ष चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता या प्रभागात भाजपकडून कमळ चिन्हावर फक्त एकच उमेदवार मैदानात असेल, तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर दोन उमेदवार निवडणूक लढवतील. उर्वरित पाच उमेदवारांना अपक्ष म्हणून प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे पक्षाच्या नियोजनावर आणि प्रचार यंत्रणेवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, मुंबईतही भाजपला धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक 211 मध्ये कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने भाजप उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात आलेला नाही. तसेच वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवाराने अर्ज दाखल करण्यासाठी उशीर केल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे या दोन वॉर्डांमध्ये भाजपकडून प्रत्यक्षात उमेदवारीच राहिलेली नाही, अशी चर्चा सुरू आहे. याचवेळी मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांच्या अर्जांवर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. एबी फॉर्मवर डिजिटल सही असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने या उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. एकीकडे भाजप-शिंदे गटाला फॉर्म बाद होण्याचा फटका, तर दुसरीकडे ठाकरे गटावर आक्षेपांची टांगती तलवार, यामुळे महापालिका निवडणुकीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg