loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये दयाल जि.प.गटात अण्णा कदम विरुद्ध अजिंक्य मोरे सामना रंगणार

खेड (प्रतिनिधी) - खाडीपट्टा विभागात थेट सामना; शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीपट्टा विभागात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या विभागात आता शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार असून, ही निवडणूक जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची ठरण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अरुण उर्फ अण्णा कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे लहान भाऊ आहेत. अण्णा कदम यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेत सभापती पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून, खेड पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी कार्यभार भूषवला आहे. प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक ताकद आणि शिवसेनेतील दीर्घ कारकीर्द यामुळे अण्णा कदम यांची उमेदवारी खाडीपट्टा विभागातून शिवसेना पक्षाकडून निश्चित झाल्याचे मानले जात आहे. शिवसैनिकांनीही त्यांच्या विजयावर विश्वास व्यक्त करत आधीच शिक्कामोर्तब केल्याचे चित्र आहे.

टाईम्स स्पेशल

दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अजिंक्य मोरे मैदानात उतरले आहेत. अजिंक्य मोरे हे एकेकाळी शिवसेना नेते रामदास कदम यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र शिवसेनेत झालेल्या पक्षांतर्गत घडामोडीनंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांनी रामदास कदम यांची साथ सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. या निर्णयानंतर अजिंक्य मोरे यांची राजकीय भूमिका आणि उमेदवारी खाडीपट्टा विभागात विशेष लक्षवेधी ठरत आहे. दोन्ही बाजूंनी ताकदवान उमेदवार, जुनी राजकीय नाती, अनुभव आणि भावनिक समीकरणे यामुळे खाडीपट्टा विभागातील ही निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असा थेट सामना होत असल्याने मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg