loader
Breaking News
Breaking News
Foto

​संजू परब यांचा विजय हा जनतेच्या विश्वासाचा कौल; आमदार निलेश राणे यांच्याकडून अभिनंदन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नगरसेवक पदासाठी मिळवलेला दणदणीत विजय हा जनतेने त्यांच्या कार्यावर दाखवलेला स्पष्ट विश्वास आहे, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी त्यांचे कौतुक केले. ​संजू परब यांनी या निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळवत आपला गड राखला आहे. या यशाबद्दल आमदार निलेश राणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांनी परब यांच्या पुढील सामाजिक आणि शहराच्या विकासात्मक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या. ​याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, भूषण सारंग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg