loader
Breaking News
Breaking News
Foto

नववर्ष धुंदीत नव्हे, शुध्दीत साजरे करा, नशाबंदी मंडळाच्यावतीने आवाहन

मुंबई -दीपक साळवी - समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता खूपच भयानक रुप धारण करित असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न सदृढ व व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नविन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नविन वर्षाचा संकल्प ठेवून करित असतो. परंतु ३१ डिसेंबर यादिवशी अनेक तरुण स्वतःच्या सुंदर आरोग्यमय जिवानाला काळीमा फासतात. ईतकेच नव्हे तर वर्षाच्या अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या अनमोल जिवनाचाही अखेरचा ठरतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

31 डिसेंबर यादिवशी अनेकजण व्यसन करणारे व पहिल्यांदाच व्यसन चाखणारे असतात म्हणुन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य च्या वतीने मंगळवार, 30 डिसेंबर 2025 दुपारी 02.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत 138 बेस्ट बस स्टाँप बाहेर, कँपिटल सिनेमा समोर, सिएसएमटी स्टेशन बाहेर, सिएसएमटी, मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नववर्ष धुंदित नव्हे तर शुध्दित साजरे करा असे प्रेमाचे नम्र आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आले पृथ्वीतालावरील कोणताही प्राणी दारु पित नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजा यांचे सेवन करित नाहीत. र्निबुध्दी असलेले हे प्राणी त्यांच्या आरोग्यास तसेच त्यांच्या जमातीस अपायकारक असलेले व्यसनांच्या सेवनापासुन दुर असतात. परंतु मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात बुध्दिमान असुनही तो र्निबुध्दी असल्यासारखा व्यसनांना जवळ करुन आपले व आपल्या समस्त मानव जातीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्नशिल आहे याच मानवावर निसर्गातील प्राण्यांची ही जबाबदारी आहे.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमावेळी बलुन रुपी प्राण्यांनी आम्ही कोणतेही व्यसन करित नाहीत, तुम्ही तर माणसं आहात असा उपस्थितांना संदेश दिला. यावेळी प्राण्यांचे एअर बलून, व्यसनमुक्तीची पोस्टर्स प्रदर्शनी, स्टँण्डीज, महामानवाचे कट आऊट हे जनतेचे लक्ष वेधुन माहिती देत होते. सेल्फी काँर्नर मध्ये उपस्थित तरुणाईने तर सेल्फी काढुन मित्र, मैत्रीणींना पाठविण्यात मग्न होते. सदर कार्यक्रमातजन जागृती विद्यार्थी संघ, मानखुर्द, मुंबई यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तसेच सिद्धार्थ महाविद्यालय आनंद भवन च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात विशेष सहभाग दिला. 2026 मध्ये मी व्यसनमुक्त राहीन अशा संकल्पाला उपस्थित लोक उस्फुर्त प्रतिसाद देत होते. एकीकडे चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढत असताना मुंबईकरांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राला नशामुक्तीकडे नेण्याचे पाऊल आहे असे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. एकनाथ तांबवेकर, कार्यकारिणी सदस्य श्री.बॉस्को डिसोझा तसेच विविध संस्था संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते. मुंबई शहर जिल्हा संघटक श्रीम. चेतना सावंत यांनी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली व त्यानंतर नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे समापन झाले. - र्षा विद्या विलास सरचिटणीस 09869289453 , अमोल स. भा. मडामे चिटणीस 07208701120

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg