loader
Breaking News
Breaking News
Foto

महानगर गॅस कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरची मनमानी, काम त्वरित थांबवण्याचे आदेश - लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राज आंब्रे

खेड (प्रतिनिधी) - लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये आवाशी फाटा येथील एम को पेस्टिसाइड ते एस आर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर महानगर गॅस कंपनी चे ठेकेदार रस्त्यामधेच खोदाई करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आज निदर्शनात आले आहे. एमआयडीसीचे अधिकाऱ्यांना तिथे त्वरीत प्राचारण करून काम थांबवण्याबाबत च्या सूचना त्यांना दिल्या आहेत. मुळात एमआयडीसीचे रस्त्यांची दैनिय अवस्था आहे. त्यात महानगर गॅस कंपनीने गेल्या सहा महिन्यापासून रस्त्याला घासून खोदाई करून सगळी माती रस्त्यावर टाकलेली होती. यावर वारंवार तक्रारी करून संबंधितांना बोलवून सूचना करण्यात आल्या होत्या. रस्ते पूर्ववत दुरुस्त करून देतो असे त्यांनी सांगितले होते. परंतु त्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही होताना दिसत नाही. यापुढे महानगर कंपनीमार्फत अशा पद्धतीने काम होत असेल तर ते काम होऊ देणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच माती टाकून बुजवलेले रस्ते त्वरित योग्य पद्धतीने दुरुस्त करावेत असे निर्देश दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg