loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी संदीप बांदेकर यांची निवड

बांदा (प्रतिनिधी) - महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने येथील संदीप पुंडलिक बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश खरात यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी पुणे येथे केंद्रीय कार्यकारणी प्रदेश बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा नूतन कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली. केंद्रीय कार्यकारिणीवर आनंद लाड, जिल्हा उपाध्यक्षपदी मोहन गावडे, दिनेश तांबे, जिल्हा सरचिटणीसपदी संजय गोवेकर, जिल्हा कोषाध्यशपदी महेश राऊळ यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, सचिन मेंगाळे, राहुल बोडके, सागर पवार, अमर लोहार, उमेश आनेराव उपस्थित होते. येत्या काळात संघटनेसाठी सर्वोतपरी काम करणार असुन कामगारांच्या हितासाठी त्यांच्या अडचणीत अहोरात्र कामगारांसोबत राहणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg