loader
Breaking News
Breaking News
Foto

निवळी ग्रामपंचायत रावणांगवाडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; कचऱ्याचे नियोजन करण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील निवळी ग्रामपंचायत परिसरात व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा मोठ्या प्रमाणात कचरा दररोज जमा होत असतो. ग्रामपंचायतकडे कचरा जमा करण्यासाठी शासनाने गाडी उपलब्ध करून दिली आहे तरी देखील ती बंद अवस्थेत आहे. याचा फटका देखील स्थानिक पातळीवर संपूर्ण गावाला व व्यापारी वर्गाला बसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायत परिसरात रावणांगवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठत असल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा, अस्वच्छतेचा त्रास होत आहे. तेथील ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त करत कचरा व्यवस्थापन यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे. मात्र तरीदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत उपसरपंच संजय निवळकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली असून मासिक सभेमध्ये हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मात्र त्यावर ठोस असे उत्तर मिळाले नाही. याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि शासनाकडून मिळालेली कचरा संकलनासाठी असलेली गाडी कार्यान्वित करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.

टाइम्स स्पेशल

ग्रामपंचायतमध्ये सरपंच यांचा मनमानी कारभार सुरू असून ग्रामपंचायत स्वतःच्या मालकीची आहे असे सरपंच वागत असल्याचे संजय निवळकर यांनी म्हटले आहे. मासिक सभेमध्ये प्रश्नांचा भडीमार करत संजय निवळकर यांनी सरपंच यांना घेरले आता तरी याबाबत उपाययोजना केली जाईल अशी आशा निवळकर यांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg