मुंबई : आम आदमी पार्टी (आप) मुंबईने आगामी २०२६ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी आपला सर्वसमावेशक जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. दशकांच्या दुर्लक्ष आणि भ्रष्टाचारावर थेट उपाय म्हणून मांडलेला हा जाहीरनामा दिल्ली आणि पंजाबमधील यशस्वी प्रशासन प्रारूपावर (मॉडेलवर) आधारित आहे. ‘केजरीवालची गॅरंटी’ या बॅनरखाली मुंबईच्या कायापालटाचा अजेंडा यात निश्चित करण्यात आला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, “अफाट संपत्ती असूनही मुंबई शहरीकरणाचा एक विद्रूप, अस्वच्छ आणि असुरक्षित चेहरा बनली आहे. जर योग्य नियोजन केले, तर मुंबई जगासाठी एक आदर्श बनू शकते." त्या पुढे म्हणाल्या, “७५,००० कोटी रुपयांहून अधिक बजेट असलेल्या बीएमसीने केवळ प्रचंड भ्रष्टाचार आणि निकृष्ट सेवा दिल्या आहेत. रिअल इस्टेटचे मूल्य लाटण्यासाठी बीएमसीच्या शाळा जाणीवपूर्वक बंद केल्या जात आहेत आणि सध्या ३ लाखांहून कमी विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत. प्रस्थापित पक्षांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला असून जनहितापेक्षा स्वतःच्या लोभाला आणि भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा अस्तित्वातच नाही. आम्ही दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मुंबईत जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा आणि मोफत वीज देऊ." “आमचा जाहीरनामा हा केवळ एक पर्याय नसून मुंबईची प्रतिष्ठा आणि क्षमता पुनर्संचयित करण्याची एक ठोस योजना आहे. आम्ही मुंबईकरांना आवाहन करतो की त्यांनी स्वतःच्या आणि शहराच्या हितासाठी मतदान करावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'झाडू'ने पूर्ण साफसफाई करावी. मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या, “आज कोणत्या पक्षाची कोणाशी युती आहे हे कोणालाच माहीत नाही, कारण युतीची एक 'खिचडी' झाली आहे. एका पालिकेत सोबत लढणारे पक्ष दुसऱ्या पालिकेत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. 'आप' ही निवडणूक आमच्या 'कामाच्या राजकारणावर' (काम की राजनीती) लढत आहे. आम्ही सुशिक्षित आणि सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या तरुणांना संधी दिली आहे.”
जाहीरनाम्यातील प्रमुख 'केजरीवाल गॅरंटी' आणि सुधारणा: मुंबईसाठी चार 'केजरीवाल गॅरंटी': १. मोफत आणि २४x७ पाणी: प्रत्येक घराला दरमहा २०,००० लिटरपर्यंत मोफत नळ पाणी आणि २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी. गळती नियंत्रण योजना आणि १००% सांडपाणी प्रक्रियेसह पाणीपुरवठा व्यवस्थेचा पूर्ण कायापालट. २. जागतिक दर्जाचे शिक्षण: बीएमसी शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी प्रति शाळा १ कोटी रुपयांची तरतूद. सर्व विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास आणि प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनची सुविधा. ३. मोहल्ला क्लीनिक: मोफत सल्ला, औषधे आणि चाचण्या उपलब्ध करून देण्यासाठी १००० मोहल्ला क्लीनिकची स्थापना. ४. शून्य वीज बिल: 'बेस्ट'द्वारे प्रति कुटुंब २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत मीटर बसवणे आणि विकेंद्रित सौर ऊर्जेवर भर. नागरी पुनरुज्जीवनासाठी उपाय: वाहतूक आणि खड्डेमुक्त रस्ते: किमान १०,००० इलेक्ट्रिक बसेससह 'बेस्ट'चे पुनरुज्जीवन, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास आणि वैज्ञानिक “झिरो पॉटहोल” प्रणालीद्वारे खड्डेमुक्त रस्ते. बेस्ट डेपोच्या व्यापारीकरणाला पूर्णविराम. कचरा आणि स्वच्छता: कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती आणि दंडात्मक प्रणाली. २ लाख सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती आणि यांत्रिकीकरणाद्वारे मानवी हाताने मैला साफ करण्याची प्रथा (manual scavenging) बंद करणे. महिला व बाल सक्षमीकरण: अल्प उत्पन्न गटातील गरोदर महिलांना मुलाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत दरमहा ५,००० रुपयांची आर्थिक मदत. १२ वर्षांखालील मुले आणि महिलांची मोफत आरोग्य तपासणी. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि शाळांमध्ये करिअर कौन्सेलरची नियुक्ती. LGBTQi+ हक्क: भेदभावमुक्त नागरी सेवा, सार्वजनिक ठिकाणी जेंडर-न्यूट्रल (लिंग-तटस्थ) स्वच्छतागृहे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे. व्यवसाय आणि फेरीवाले: दुकानाच्या परवान्यासाठी एकवेळ नोंदणी (One-time registration), २८० फेरीवाला क्षेत्रांची निर्मिती आणि गिग वर्कर्ससाठी विश्रांतीगृहे. पर्यावरण: मोकळ्या जागा आणि कांदळवनांचे (mangroves) संरक्षण. मिठागरांचा नाश थांबवणे, आरे कॉलनीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विलीन करून राखीव जंगल घोषित करणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कडक नियम. सर्वांसाठी घरे: परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा (PEB) वापर करून पुनर्वसन करणे. पारदर्शक प्रशासन: बीएमसीच्या सर्व प्रक्रियांचे डिजिटायझेशन आणि मुंबईसाठी सक्षम, एकात्मिक प्रशासकीय अधिकारासाठी लढा. पारदर्शक प्रशासनाचे वचन: “मुंबई आणि दिल्ली-पंजाबमधील 'आप' सरकारमधील फरक म्हणजे येथील राजकीय इच्छेचा अभाव,” असे श्रीमती मेनन म्हणाल्या. “आम्ही भ्रष्टाचार आणि कर्ज न घेता जागतिक दर्जाचे शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज दिली आहे. आम्ही तीच पारदर्शकता बीएमसीमध्ये आणू. हा जाहीरनामा मुंबईला 'बिल्डर-कंत्राटदार लॉबी'कडून मुक्त करून 'आम मुंबईकरांना' परत मिळवून देण्याचे वचन आहे.” आम आदमी पार्टीचा हा जाहीरनामा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणादायी वारशास समर्पित आहे. बीएमसी निवडणुकीत बदल, विकास आणि प्रामाणिक प्रशासनासाठी मतदान करण्याचे आवाहन पक्षाने सर्व नागरिकांना केले आहे.















































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.