ठाणे (प्रतिनिधी) - थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत स्वतःचा तसेच, इतरांचाही जीव संभाळून करा, असे आवाहन ठाणे शहर वाहतुक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी केले आहे. यंदा मनपा निवडणुक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असुन वाहतुक शाखेचे ७३९ इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. असेही उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले.
थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागता सोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण- डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा आणि भिवंडी-निजामपुर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतुक शाखेमध्ये ५९ अधिकारी व ६८० कर्मचारी असे एकुण ७३९ इतके मनुष्यबळ तैनात केले आहे. आयुक्तालय क्षेत्रात एकुण ५४ ठिकाणी वाहतुक पोलिसांची नाकाबंदी असुन यात येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजणोली नाका ही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत.
या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, यंदा २०२५ या वर्षात लोक अदालतमध्ये (न्यायालयात) १ लाख ४२ हजार ६०७ ई चलन कारवाई करण्यात आली असुन एकुण १४ कोटी ३४ लाख ४३ हजार २०० इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केला आहे.






















































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.