loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरवली शिक्षण संस्थेच्या परिसराचे शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण

लांजा (संतोष कांबळे) :- पंचायत समितीचे भूतपूर्व उपसभापती स्वर्गीय गंगाधर धोंडू उर्फ भाई लाड यांनी मोठ्या कष्टाने नावारूपाला आणलेल्या वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तु. पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व यामाहा ट्रेनिंग स्कूलचा परिसर आता शैलेश रमेश डोळस नावाने ओळखला जाणार आहे. या शैक्षणिक संकुलाच्या नामकरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुळचे वेरवली बुद्रुक गावचे असलेल्या शैलेश डोळस यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी रमेश डोळस यांच्या हस्ते नावाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी गिरीश काशिनाथ कोळवणकर, उद्योगपती रवींद्र (अण्णा) द्वारकानाथ सामंत, विश्वास परशुराम चितळे, श्रीधर रघुनाथ ठाकूर, मारुती रामचंद्र डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात सुरूवातीला देणगीदार शैलेश डोळस व त्यांच्या परिवाराचे ढोलताशा व पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत करण्यात आले. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नाम फलकाचे अनावरण उद्योगपती रवींद्र उर्फ अण्णाशेठ सामंत यांनी केले. त्यानंतर श्रीमती रोहिणी रमेश डोळस सांस्कृतिक भवनाचे अनावरण विश्वास परशुराम चितळे यांनी केले. सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण श्रीधर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मारुती डोळस यांच्या हस्ते करण्यात आले. रमेश धोंडू डोळस सभागृहाच्या नामफलकाचे अनावरण गिरीश कोळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. देणगीदार शैलेश रमेश डोळस यांनी संस्थेप्रती केलेल्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने त्यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन परिवाराचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शैलेश रमेश डोळस यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती आपले ऋणानुबंध व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगत मधून शैलेश डोळस यांच्या दातृत्व भावनेचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला तालुकाभरातून अनेक शिक्षणप्रेमी नागरिक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल रेडीज यांनी तर सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक विनोद बंडगर व आभार सचिन कांबळे यांनी मानले. सायंकाळी मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर झाला रंगमंचावर दीप प्रज्वलन व नटराजाच्या व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यावेळी शैलेश रमेश डोळस त्यांच्या मित्रमंडळींची त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया A.v माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर दाखवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. यामध्ये दीप नृत्य, लोकनृत्य, दिंडी भारुड, लावणी, जाकडी इत्यादी कला गुण दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग ,प्रेक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन श्रुतीक प्रभुलकर व सौ .साक्षी हटकर यांनी केले.आभार सचिन कांबळे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg