loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्ष अखेरच्या कॅबिनेट बैठकीला दांडी, पुन्हा नाराज झाल्याची चर्चा

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. वर्षाच्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिक हवा मिळाली. शिंदे नाराज असल्याचे प्रकर्षाने जाणवले. वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार नाहीत अशी माहिती समोर येत होती. तब्येत ठीक नसल्याने ते ठाण्यात घरीच आराम करतील अशी माहिती समोर येत होती. आज अखेर एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीला हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर भाजपने महापालिकेच्या निवडणुकीच तयारी सुरु केली. पण कुणाच्याच ताकास तुरी लागू दिली नाही. जागा वाटपापासून ते महायुतीपर्यंत अनेक ठिकाणी केवळ बैठकांचे जोर सत्र सुरु ठेवले. भाजपने पत्ते काही उघड केले नाही. काही ठिकाणी कमी जागा, तर प्रस्थापित जागांवर भाजपचा दावा यामुळे शिंदेसेना अनेक ठिकाणी नाराज होती. पण अखेरच्या काही तासात भाजपसोबत वाजल्याने राज्यातील २९ पैकी ११ ठिकाणीच महायुती होऊ शकली. इतर १८ ठिकाणी केवळ बैठका, चर्चा आणि तोंडाच्या वाफातच क्रयशक्ती वाया गेली. भाजपने अनेक ठिकाणी झुलवत ठेवल्याचा आरोप शिंदे सेनेच्या नेत्यांनी केला. या सर्व घाडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg