loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात रामगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

मालवण (प्रतिनिधी) - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे क्षेत्रीय शिक्षा संस्थान (आर.आई.ई.) श्यामला हिल्स भोपाळ, मध्यप्रदेश या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय स्तर विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिरच्या ओमतेज उल्हास तारी व तन्मय बाबु परब या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सादर केलेल्या 'Waste is Best' या प्रतिकृतीला महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रतिकृतीचा मान तसेच पेटेंन्डसाठी रजिस्ट्रेशन करण्याचा मान मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कामगिरीबद्दल दोन्हीही विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा तसेच प्रशालेचा NCERT तर्फे सन्मानचिन्ह, गोल्ड मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल दोन्हीही विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष वा.स.प्रभूदेसाई, उपाध्यक्ष सु.रा.तळवडेकर, सचिव वि.म.मटकर, सहसचिव डी.डी.वाघ, खजिनदार विजय कुवळेकर, संस्था संचालक अभय प्रभुदेसाई, सुभाष धुरी, ज्ञानदेव जाधव, तातोबा घाडीगांवकर, मोहन घाडीगांवकर, वसंत हाटले, घनश्याम चव्हाण, गोपीनाथ लाड, नरहरी परूळेकर, नरेंद्र हाटले, मुख्याध्यापिका सौ. डि.टी.पेडणेकर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg