loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी कचरा डेपोच्या दुरावस्थेवरून संजू परब आक्रमक; पालकमंत्र्यांकडे २५ एकर जागेची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषदेच्या कारीवडे येथील कचरा डेपोवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याची गंभीर दखल घेत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह आक्रमक पवित्रा घेतला. कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी 'स्पॉट पंचनामा' केला आणि या अस्वच्छतेला सर्वस्वी पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप केला. ​पुढील शंभर वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी किमान २५ एकर शासकीय भूखंड किंवा खाजगी जागा खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​गेल्या महिनाभरापासून कचरा विघटन करणारे यंत्र बंद असल्याने डेपोवर कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. या परिस्थितीवर संताप व्यक्त करताना संजू परब म्हणाले, "आम्ही सत्ता हातात घेतल्यानंतर थेट कचरा डेपोवर कामाची पाहणी करायला आलो आहोत, गार्डनमध्ये फिरायला नाही." याद्वारे त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. सावंतवाडी शहर कचरामुक्त आणि दुर्गंधीमुक्त करण्यासाठी ५० ते १०० वर्षांच्या भविष्याचा विचार करून मोठ्या जागेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहणी दरम्यान संजू परब यांनी कचरा डेपोवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दुरवस्थेकडेही लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे आणि इतर सुरक्षा साधने पुरवली जात नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना पाचारण करून त्यांनी जाब विचारला आणि तातडीने सोयीसुविधा पुरवण्याचे आदेश दिले.

टाइम्स स्पेशल

सावंतवाडी पालिकेने वेंगुर्ले नगरपालिकेप्रमाणे स्वच्छतेबाबत प्रभावी काम करणे आवश्यक आहे, असे मत परब यांनी व्यक्त केले. या प्रश्नी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg