loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

खेड -(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी खेडचे सहाय्यक गटविकास अधिकारी करपे , शिक्षण विस्तार अधिकारी वरेकर, शिक्षक पतपेढीचे माजी संचालक तथा जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर, शिक्षक संघ शाखा खेडचे अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, कार्याध्यक्ष सुधाकर पाष्टे, कोषाध्यक्ष मंगेश झावरे, प्रभाकर कोळेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सलग पाच वर्षे दिनदर्शिका वितरण उपक्रम सातत्याने राबवून प्रत्येक शाळेपर्यंत सदर दिनदर्शिका पोहोचवत असल्याबद्दल सहाय्यक गटविकास अधिकारी करपे यांनी शिक्षक संघाचे कौतुक केले. तसेच आपले शिक्षक दिनदर्शिकेकडे आरशाप्रमाणे पाहून काम करतात. संघटनांनी असे सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत असे ते यावेळी म्हणाले. सर्वांनी शैक्षणिक कामात चांगले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस एकनाथ पाटील यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गंभीरे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी पं . समितीचे कक्ष अधिकारी इचूर , सल्लागार अशोक मगदूम, धर्मराज वाडकर, विनोद आरेकर, मनोहर मनवळ, विजय सकपाळ, गणोजी माने, प्रमोद म्हादे, सुभाष बारगुडे, रवींद्र पाबे ,कोदारे , राहुल तुगावकर , मंगेश चाळके , सुरेश तांबे , पास्टे, आरेकर , मोर्डेकर उपस्थित होते. सदर दिनदर्शिकेचे वितरण खेड तालुक्यातील प्रत्येक शाळेत केले जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg