loader
Breaking News
Breaking News
Foto

सब ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरीचा विहंग दप्तरदार याला रौप्य पदक

तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित सब ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत वासुदेव हॉल, उद्यमनगर, आर.एस.एन. हॉटेलच्या मागे, मुंबई–गोवा हायवे, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिंग सेंटर, ओम साई मित्र मंडळ साळवी स्टॉप येते प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेणारा व ल.ग पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी येथे शिक्षण घेणारा विहंग निलेश दप्तरदार याने उल्लेखनीय यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विहंग याने तायक्वांडो फ्रीस्टाइल पूमसे प्रकारात रौप्य पदक पटकावले. सदर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शशीरेखा कररा यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच विहंग याला प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आई-वडिलांच्या सततच्या प्रोत्साहनामुळेच विहंग याने हे यश संपादन करू शकला, असे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले. विहंगचा या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg