loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील सुमारे ७५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

खेर्डी-चिपळूण (संतोष पिलके) - चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे प्रमुख उपस्थितीत दादर येथील विहीर बांधणे १५ लाख, दादर येथे गणपती विसर्जन घाट बांधणे १० लाख, दादर अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे २५ लाख, दादर येथे महिला प्रभाग संघासाठी इमारत भूमिपूजन २५ लाख अशा कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते अशोकभाई कदम म्हणाले की, दादर गाव छोटे असले तरी मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेत याबाबत वर्णन केले तसेच ते म्हणाले की, पाच सहा वर्षांपूर्वी जेव्हा दसपटी भागात नैसर्गिक आपत्ती झाली त्यावेळी दसपटी गावातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता त्यावेळी सुद्धा आमदार महोदय यांच्या विशेष प्रयत्नातून महत्त्वाचे ब्रिज देखील बांधण्यात आले. आमदार महोदय यांच्या प्रयत्नातून या भागातील गावामध्ये ओवळी, नांदिवसे, रिकटोली, तिवरे या भागात धरणांची सुद्धा कामे अतिशय चांगल्या पद्धतीची चालू आहेत. या भागात असा विकास यापूर्वी कोणीही केला नाही असे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिलांसाठी विशेष बचत गट इमारत होत असून बचत गटाच्या अध्यक्षा यांनी सुद्धा मनापासून आमदार महोदय यांचे कौतुक केले. अमित कदम याप्रसंगी बोलताना म्हणाले की, जेव्हा जेव्हा दादर गावाला कोणत्याही विकास कामाची गरज होती ती मात्र तातडीने त्यांनी पूर्ण केली. प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दसपटी बरोबर दादर गावाचा विकास होणे अतिशय गरजेचे आहे. गावची मतदार संख्या महत्त्वाची नसून गावातील लोकांची ज्या प्रकारची मागणी आहे त्या मागण्या पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. मतदान किती होते हे मी पाहत नाही, अशाही प्रकारचे उद्गार त्यांनी काढले. मी जनतेचा सेवक असून भविष्य सुद्धा अशाच प्रकारचा विकासासाठी प्रयत्नशील राहील, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शेखर निकम, अशोकभाई कदम, अमित कदम, पांडूशेठ माळी, स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे, कविता आंबेडे, प्रकाश शिंदे, प्रदीप शिंदे, अनंत सकपाळ, प्रकाश पवार, सविता निकम, मानसिक कदम, सुरज पवार, प्रवीण पवार, वैशाली नलावडे, सुरेखा गमरे, जान्हवी सकपाळ, जागृती पवार, जगन्नाथ सकपाळ, विलास सकपाळ, जयश्री सकपाळ, संदीप पवार, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg