loader
Breaking News
Breaking News
Foto

करुळ ग्रामपंचायतच्यावतीने बंधारे घालून नवीन वर्षाचे स्वागत

वैभववाडी (प्रतिनिधी) - करुळ ग्रामपंचायतच्यावतीने गावात १० वनराई व कच्चे बंधारे घालण्यात आले आहेत. या सर्व बंधार्‍यांची वैभववाडी पंचायत समितीचे नूतन गट विकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जामदारवाडी येथे घालण्यात आलेल्या बंधार्‍याचे उद्घाटन प्रीमेश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन वर्षाचे स्वागत गावाने नवीन बंधारा घालून केले आहे. या उपक्रमाचेही मान्यवरांनी कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच नरेंद्र कोलते, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, श्रीफजाधव, मुख्याध्यापक दीपक घाटगे, शिक्षक विलास गुरव, श्री.जाधव, उपसरपंच भास्कर सावंत, संजय कदम, शिवाजी पवार, राजेंद्र पवार, दत्ताराम पाटील, ग्रामसेवक शशिकांत गुरव व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात बंधार्‍यांची कामे सुरू आहेत. दहा बंधारे ग्रामपंचायत करूळ, के.सी.महाविद्यालय मुंबई, माध्यमिक विद्यालय करूळ, ग्रामसेवक संघटना वैभववाडी यांच्यावतीने घालण्यात आले आहेत. या बंधार्‍यामुळे गावातील विहिरींच्या तसेच बोअरवेलची पाण्याची पातळी वाढली आहे. बंधार्‍यातील पाण्याचा फायदा शेतीसाठी चांगल्या प्रकारे होत आहे. पाळीव जनावरांनाही देखील या बंधार्‍याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg