loader
Breaking News
Breaking News
Foto

न्हावेली-पंचदेवी पार्सेकरवाडी रस्त्याचे संजू परब यांच्या हस्ते थाटात भूमिपूजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातील बहुप्रतिक्षित पंचदेवी पार्सेकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या रस्त्यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची दळणवळणाची समस्या सुटणार असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या प्रसंगी न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका हळदणकर, स्नेहा पार्सेकर, प्रशांत साटेलकर, शरद धाऊसकर, दीपक नाईक, ओम पार्सेकर, दीपक पार्सेकर, मधुकर पार्सेकर, परेश दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​भूमिपूजन प्रसंगी बोलताना संजू परब म्हणाले की," माजी शालेय शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांना त्यांनी प्राधान्य दिले असून, न्हावेली गावातील हा रस्ता त्याच विकासकामांचा एक भाग आहे."

टाइम्स स्पेशल

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्हावेली ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg