loader
Breaking News
Breaking News
Foto

सावधान! दरड कोसळण्याची शक्यता आहे.. तेथूनच वाहने प्रवास करताहेत.. देवेंद्रा अजब तुझे सरकार!

रत्नागिरी - मुुंंबई-गोवा महामार्गाची दैनावस्था अजून काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रेंगाळलेल्या कामामुळे आला दिवस पुढे जात आहे. हे वर्ष पण सरले पण महामार्गाची नीट व्यवस्था अजून सरकार करु शकले नाही. निवळी ते संगमेश्‍वर पर्यंत महामार्गाची गंभीर स्थिती आहे. चिखल, माती, पाण्यामुळे तयार झालेले लाखों स्पीड ब्रेकर प्रवासात त्रासदायक ठरत आहेत. इतकेच काय तर... सावधान! दरड कोसळण्याची शक्यता आहे.. तेथूनच वाहने प्रवास करताहेत.. देवेंद्रा अजब तुझे सरकार! असे म्हटले जात आहे. किमान जेथे धोका आहे, तो मार्ग बंद करायला हवा. धोका पत्करुन प्रवाशांना वाहने जाण्यास परवानगी देणे हे मुर्खपणाचे नाही तर काय? एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? निरपराध माणसे मारली जातील. ज्या ज्या ठिकाणी सावधान! दरड कोसळण्याची शक्यता आहे.. तो मार्ग तात्पुरता बंद करण्यात यावा, अशी मागणी कोकणी जनतेतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवळी-बावनदी ते संगमेश्‍वरपर्यंत रात्रीच्या प्रवासात सर्वच वाहनांनी दक्षता बाळगण्याची शक्यता आहे. दुचाकी वाहनचालकांनी तर अधिकच काळजी घ्यायला हवी. अनेक दुचाकीस्वार अडथळ्यांच्या रस्त्यांवर पडून दुखापती झाल्या आहेत. एप्रिल २०२६ पर्यंत महामार्ग पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मात्र सध्या सुरु असलेले काम पाहता चार महिन्यात नव्हे तर वर्षभरात काम पूर्ण होणार नाही, असे जाणकारांतून म्हटले जाते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg