loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनावल माध्यमिक विद्यालयाचे आज स्नेहसंमेलन; 'स्वरसंध्ये'चा रंगणार आविष्कार

तिलारी (प्रतिनिधी) : कसई-दोडामार्ग शिक्षण प्रसारक मंडळ, दोडामार्ग संचलित माध्यमिक विद्यालय सोनावल (ता. दोडामार्ग) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'स्वरसंध्या' या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोनावलवासीय आणि परिसरातील ग्रामस्थांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी सायंकाळी ७.०० वाजता स्नेहसंमेलनाचा मुख्य सोहळा सुरू होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कसई-दोडामार्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत (भाई) वसंत परमेकर लाभणार आहेत. तर सन्माननीय अतिथी म्हणून संस्थेचे कार्यवाह रामचंद्र यशवंत पाटील आणि तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली सुनील गवस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

टाईम्स स्पेशल

स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री ८.०० वाजता सुरू होणारा 'स्वरसंध्या' हा विविध गुणदर्शनपर कार्यक्रम. यामध्ये शाळेचे विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला सोनावल, मेढे, पाळये, हेवाळे आणि वीजघर येथील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हापसेकर एन. पी. सांस्कृतिक विभाग प्रमुख फर्जंद आर. डी. आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg