loader
Breaking News
Breaking News
Foto

भरधाव बसने अनेक प्रवाशांना चिरडले २ महिलांसह ४ ठार, ९ गंभीर जखमी

मुंबई : मुंबईच्या भांडुप पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात आज बेस्ट बसने १० ते १२ जणांना चिरडल्याची भीषण घटना घडली आहे. या काळजाचा थरकाप उडवणार्‍या अपघातात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तसेच ९ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनियंत्रित बसने दिलेल्या धडकेमुळे परिसरातील एक विजेचा खांबही कोसळला असून घटनास्थळी मोठी खळबळ उडाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस अत्यंत वेगात होती. बसने प्रवाशांना उडवल्यानंतर एक वळण घेतले आणि वेगात पुढे गेली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, रस्त्यावरील विजेचा खांबही उन्मळून पडला. सुरुवातीला दोन महिलांच्या मृत्यूची माहिती समोर आली होती, मात्र नंतर हा आकडा ४ वर पोहोचला आहे. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बस डेपो परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. अपघात झालेली बस ही इलेक्ट्रिक बस आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला का? बसमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता का? चालकाचा ताबा नेमका का सुटला? या सर्व बाजूंचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg