loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील निबंध स्पर्धेत आर.पी.बागवे हायस्कूलचा चैतन्य भोगले तृतीय

मालवण (प्रतिनिधी) - शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मसुरे आर. पी. बागवे हायस्कूलचा विद्यार्थ चैतन्य भगवान भोगले याने उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याचा जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विज्ञान विषयावरील सखोल मांडणी, विचारांची स्पष्टता तसेच विषयाशी सुसंगत उदाहरणांमुळे त्याच्या निबंधाचे परीक्षकांकडून विशेष कौतुक झाले. या यशाबद्दल आर. पी. बागवे हायस्कूलचे मुख्याध्यापिका अर्चना कोदे, संस्था चालक, शिक्षकवृंद व पालकांनी चैतन्यचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत संशोधनाची आवड निर्माण होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg