loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे येथे रत्नागिरी जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळाचे वार्षिक जनरल सभा उत्साहात

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 28 /12 /2025 रोजी अध्यक्ष गजानन गणपत लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोष्टी समाज भवन सावर्डे, वहाळफाटा येथे उत्साहात पार पडली. सुरुवातीला दिपप्रज्वलन व चौंडेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर समाजातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख अतिथी कोष्टी समाजाचे माजी राज्याध्यक्ष चंद्रकांत धोंडू बाईत व इतर सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात उपाध्यक्ष कृष्णा उकार्डे यांनी संस्थेच्या मागील कालावधीत केलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर सेक्रेटरी अरविंद रामचंद्र भंडारी यांनी आजअखेर सर्व आर्थिक जमाखर्चाचे वाचन केले. तसेच मार्च 2025 अखेर मंडळाचे संपूर्ण ऑडिट झालेले असून ऑडिट नोटचे देखील वाचन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेदरम्यान उपस्थित समाज बांधवांनी समस्या आणि उपाययोजना याबाबत मते मांडली. समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवा या उपक्रमांवर चर्चा होऊन वर्षासाठीचे कार्यनिश्चिती कार्यक्रम मांडण्यात आले. समाज भवन मध्ये श्री चौंडेश्वरी देवीचे समाज मंदिर तयार करावे असे एकमताने ठरवण्यात आले. नवीन कार्यकारिणीने समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक व परिणामकारक करण्यासाठी समाज बांधवांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाला समाजातील जेष्ठ मान्यवर माजी पदाधिकारी आणि समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

अध्यक्ष- गजानन गणपत लोकरे, कार्याध्यक्ष- सचिन चंद्रकांत बाईत, सचिव:- अरविंद रामचंद्र भंडारी, सहसचिव:- दिनेश परशुराम नेटके, खजिनदार:- दिपक शाहु, रेपाळ, सदस्य: सर्वश्री प्रवीण रामचंद्र पाकळे, मनोहर दगडू बाईत, प्रमोद राजाराम नेटके, रविंद्र विष्णू रेडेकर, अनिकेत भंडारी, मनोहर विष्णू भंडारी, मनोहर रामचंद्र भंडारी, रविंद्र हरिचंद्र उपरे, शेखर श्याम उकार्डे, दत्ताराम शांताराम भंडारी, सुभाष लक्ष्मण भंडारी, प्रज्ञा राजेंद्र पाणिंद्रे, मंजुषा मनोज लोकरे, सल्लागार:-सर्वश्री. चंद्रकांत धोंडू बाईत, गजानन धोंडू बाईत, अरविंद पांडुरंग रेपाळ, बबन तुकाराम लोकरे, रमेश काशिनाथ तेटांबे, मुकुंद श्रीराम भंडारी, प्रवीण विठोबा दिवटे, सदानंद रामचंद्र भंडारी, विजय विठ्ठल दुधाणे, मनोहर दगडू बाईत, रमेश शिवाजी रेपाळ, रमाकांत किसन उकार्डे, दिपक रामचंद्र रंगाटे, चंद्रकांत सिताराम रेपाळ, विलास बंडू वारे, महेश विष्णू दिंडे, रमेश राजाराम नेटके, सचिन बंडू वारे यांची निवड करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम भंडारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहसचिव चंद्रकांत रेपाळ यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg